मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन

  एस . आय . पी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हे आपण बऱ्याचदा ऐकले आहे. सिस्टिमॅटिक विथड्रॉव प्लॅन म्हणजे काय ? ते कसे काम करते ? याचे फायदे काय ? याचा उपयोग कसा होतो ? याविषयी सविस्तर माहिती पाहू या या लेखात. सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन ( SWP) म्हणजे म्युच्युअल फंडातील एक सोय , ज्याद्वारे गुंतवणूकदार आपल्या गरजेनुसार ठराविक वेळेत (उदा. मासिक , त्रैमासिक) पूर्वनिर्धारित रक्कम काढू शकतात , ज्यामुळे त्यांना नियमित उत्पन्न मिळते आणि मूळ गुंतवणूकही सुरक्षित राहते , कारण काढलेली रक्कम फक्त नफ्यातून असते किंवा कालांतराने युनिट्स कमी होतात , तर उर्वरित रक्कम बाजारात गुंतलेली राहते आणि वाढत राहते . हे एक प्रकारे म्युच्युअल फंडातील ' पेंशन ' सारखे काम करते , जिथे तुम्ही एकदाच मोठी रक्कम गुंतवून नियमितपणे पैसे काढू शकता .  नियमित अंतराने इन्व्हेस्टमेंटमधून पैसे काढण्याचा आणखी एक मार्ग आहे: सिस्टेमॅटिक विथड्रॉअल प्लान ( SWP). यात इन्व्हेस्टरने दर महिन्याला आवश्यक असलेली एक ठराविक रक्कम निश्चित करावी लागते. त्यानंतर , दिलेल्या तारखेला त्या ठराविक रकमेच्या प्रमाणात युनिट्स ...

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एस आय पी)

  ‘ म्युच्युअल फंड सही है ’ हि जाहिरात आपण रोजच ऐकत असतो . यामधील SIP म्हणजेच ' सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन '    याविषयीची जाहिरात आपण नेहमीच पाहतो / वाचतो . चला तर सविस्तर जाणून घेऊया याविषयी . SIP म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे काय ? सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन ( एसआयपी ) म्हणजे म्युच्युअल फंड्सने गुंतवणुकीसाठी सुरू केलेला मार्ग आहे ज्यात आपण एखाद्या म्युच्युअल फंड स्किम्स मध्ये नियमित कालावधीने एक निश्चित रक्कम गुंतवू शकता - जसे महिन्यातून एकदा किंवा तीन महिन्यांतून एकदा , अशाने आपल्याला एकरकमी गुंतवणूक करावी लागत नाही . यासाठी किमान रु . 500 दरमहा रक्कम गुंतवली जाऊ शकते आणि हे एखाद्या आवर्त ठेवी सारखेच आहे . जर आपण आपल्या बँकेला दर महिन्याला ठराविक रक्कम डेबीट करण्याचे निर्देश दिले तर ते फार सोयीस्कर ठरेल . भारतातील म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये एसआयपीची लोकप्रियता वाढत आहे , कारण याने शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करता येते आणि ...

बोनस शेअर

  बोनस हा शब्द नुसता ऐकला तरी आपल्यला काहीतरी मिळणार या विचाराने आनंद होतो. तसेच बोनस शेअर म्हणजे काय ? बोनस शेअरचे फायदे काय आहेत ? बोनस शेअरमुळे आपली कंपनीतील गुंतवणूक वाढते का ? या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण या लेखात जाणून घेणार आहोत . बोनस शेअर म्हणजे काय ? बोनस शेअर म्हणजे कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना दिलेली मोफत भेट असते ज्यांना ‘ स्क्रिप डिव्हिडंड किंवा ‘ कॅपिटलायझेशन इश्यू ’ म्हणूनही ओळखले जाते . बोनस शेअर्स हे अतिरिक्त खर्चाशिवाय दिलेले शेअर्स आहेत जे कंपनी आपल्या शेअरधारकांना त्यांच्या मालकीच्या शेअरच्या प्रमाणात देत असते आणि त्यासाठी कंपनी १ : १ बोनस , १ : २ बोनस , २ : ३ बोनस , २ : ४ बोनस अशा प्रमाणात बोनस जाहीर करते . जेव्हा एखादी कंपनी बोनस शेअर्स जारी करण्याचा निर्णय घेते , तेव्हा ती सध्याच्या भागधारकांची प्रमाणबद्ध मालकी कायम ठेवत थकबाकी असलेल्या समभागांची एकूण संख्या वाढवते . उदाहरणार्थ , जर एखाद्या भागधारकाकडे कंपनीचे १०० शेअर्स असतील आणि कंपनीने १ : १ बो...