भारतीय माणसाच्या जीवनात बचतीला नेहमीच महत्त्वाचे स्थान राहिले आहे. उत्पन्न कितीही असो , त्यातील काही रक्कम भविष्यासाठी बाजूला ठेवण्याची सवय अनेक कुटुंबांमध्ये दिसून येते. पूर्वीच्या पिढ्यांनी ही बचत प्रामुख्याने बँकेतील ठेवी , सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी , सोने आणि जमीन यांसारख्या पारंपरिक साधनांमध्ये केली. परतावा कमी असला तरी पैसा सुरक्षित राहतो , ही भावना त्यामागे होती. कारण भारतीय माणसासाठी पैसा कमावण्याइतकेच तो जपणेही महत्त्वाचे राहिले आहे. सोने खरेदी करणे , घर किंवा जमीन घेणे याकडे केवळ गुंतवणूक म्हणून पाहिले जात नाही. त्यामध्ये कुटुंबाची सुरक्षितता , सामाजिक प्रतिष्ठा आणि भावनिक नातेही जोडलेले असते. मात्र , बदलत्या काळानुसार आर्थिक गरजा आणि गुंतवणुकीचे पर्यायही बदलत आहेत. आज केवळ पैसा साठवणे पुरेसे नाही , तर त्याचे मूल्य काळानुसार वाढवणेही आवश्यक झाले आहे. याच विचारातून सामूहिक गुंतवणूक निधी अर्थात म्युच्युअल फंड लोकप्रिय होत आहेत. या पद्धतीत अनेक गुंतवणूकदारांचा पैसा एकत्र करून विविध कंपन्यांचे समभाग , कर्जरोखे आणि इतर आर्थिक साधनांमध्ये गुंतवला जातो. अनुभवी निधी व्यवस्थापक आण...
शेअर बाजारातील गुंतवणुकीत केवळ कंपन्यांचा आकार नव्हे , तर त्यांच्या गुणवत्तेलाही महत्त्व आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक म्हटली की मोठ्या कंपन्यांचे समभाग खरेदी करणे , बाजारातील चढ-उतारांचा अंदाज घेणे आणि योग्य वेळी गुंतवणूक करणे , अशी सर्वसाधारण कल्पना डोळ्यांसमोर येते. मात्र बदलत्या आर्थिक परिस्थितीत गुंतवणुकीच्या पद्धतीही बदलत आहेत. पारंपरिक गुंतवणुकीच्या चौकटीपलीकडे जाऊन अधिक शिस्तबद्ध आणि विशिष्ट निकषांवर आधारित गुंतवणुकीचे पर्याय विकसित होत आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे ‘स्मार्ट बीटा’. गुंतवणुकीच्या क्षेत्रात ही संकल्पना विशेष लक्ष वेधून घेत आहे. स्मार्ट बीटा ही संकल्पना सामान्यतः शेअर बाजारातील निर्देशांकामध्ये कंपन्यांचा समावेश त्यांच्या बाजारमूल्यानुसार केला जातो. ज्या कंपनीचे बाजारमूल्य अधिक , त्या कंपनीला निर्देशांकामध्ये अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे मोठ्या कंपन्यांचे समभाग निर्देशांकाच्या हालचालींवर अधिक प्रभाव टाकतात. अशा पद्धतीला बाजारमूल्यावर आधारित गुंतवणूक पद्धती म्हणतात. मात्र कंपनीचे बाजारमूल्य मोठे आहे म्हणून ती गुंतवणुकीसाठी नेहमीच सर्वो...