असे म्हणतात कि आपण पैशासाठी नाही तर पैशाने आपल्यासाठी काम करायला हवे. आजच्या धकाधकीच्या जीवनात किती हि कमवा पण पैसा शिलक्क राहत नाही किंवा असलेल्या बचतीच्या पैशात वाढ होत नाही . तेव्हा फिक्स डिपॉझिट लाच एक चांगला पर्याय आहे तो म्हणजे म्युच्युअल फंडस् . ज्यामध्ये पैसा आपल्यासाठी काम करत असतो. चला तर जाणून घेऊया म्युच्युअल फंडस् विषयी.....
म्युच्युअल फंडस् म्हणजे काय ?
म्युच्युअल फंड ही एक एसईसी-नोंदणीकृत
ओपन-एंड गुंतवणूक कंपनी/योजना आहे. जी सहसा व्यावसायिक व्यवस्थापित मालमत्ता व्यवस्थापन कंपनीद्वारे चालविली जाते जी गुंतवणूकदारांच्या गटाकडून पैसे गोळा करते आणि स्टॉक, बाँड आणि इतर सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात. याचा अर्थ, तुमच्यासारखे अनेक लोक त्यांच्या गुंतवणुकीसाठी पैसे देतात आणि ते पैसे एकत्रितपणे तज्ञ लोकांद्वारे (फंड मॅनेजर) विविध ठिकाणी गुंतवले जातात.
पोर्टफोलिओ म्हणजे काय?
म्युच्युअल फंडाच्या मालकीच्या
एकत्रित होल्डिंग्जला त्याचा पोर्टफोलिओ म्हणतात, जे एसईसी-नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागाराद्वारे व्यवस्थापित केले जाते. प्रत्येक म्युच्युअल फंड शेअर म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओवरील गुंतवणूकदाराच्या अंशतः मालकीचे आणि पोर्टफोलिओमुळे निर्माण होणारे नफा आणि तोटा दर्शवितो. म्युच्युअल फंडमधील गुंतवणूकदार त्यांचे शेअर्स म्युच्युअल फंडांकडून किंवा ब्रोकर किंवा गुंतवणूक सल्लागारांसारख्या गुंतवणूक व्यावसायिकांद्वारे खरेदी करतात आणि त्यांचे शेअर्स त्यांना विकतात/रिडीम करतात.
म्युच्युअल फंड का खरेदी करावे ?
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये एक लोकप्रिय पर्याय आहेत त्याची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे
व्यावसायिक व्यवस्थापन: तुमच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन तज्ञ लोक करतात, त्यामुळे तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नसते.
विविधीकरण: म्युच्युअल फंड एका विशिष्ट स्टॉक किंवा बाँडमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी विविध कंपन्या आणि उद्योगांमध्ये गुंतवणूक करू शकतात. जर एखादी कंपनी अपयशी ठरली तर यामुळे तुमचा धोका/जोखीम कमी होण्यास मदत होते.
कमीत कमी गुंतवणूक: तुम्ही कमी रकमेपासून (उदा. ५०० रुपये) म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू करू शकता.
तरलता: म्युच्युअल फंड गुंतवणूकदार त्यांचे शेअर्स पुढील गणना केलेल्या निव्वळ मालमत्ता मूल्यावर (NAV) - कोणत्याही व्यवसायाच्या दिवशी - कोणतेही रिडेम्पशन शुल्क वजा करून फंडात परत सहजपणे विकू शकतात.
परतावा: जेव्हा या गुंतवणुकीतून नफा मिळतो, तेव्हा तो नफा गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात वाटून दिला जातो.
सोपे:म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे सोपे आहे, आणि तुम्ही ते ऑनलाइन किंवा बँकेद्वारे करू शकता.
म्युचुअल फंडस् किती प्रकारचे आहेत?
हे मुख्यत्वे
तीन प्रकारचे असतात.
१. इक्विटी किंवा ग्रोथ फंड्स हे प्रामुख्याने इक्विटीज मध्ये म्हणजेच कंपनीच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करतात. यांचे प्राथमिक उद्दिष्ट संपत्ती निर्माण करणे किंवा भांडवलाचे
अधिमूल्यन करणे हे असते. त्यांच्यामध्ये मोठे परतावे मिळवण्याची क्षमता असते आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ते सर्वोत्तम असतात. इक्विटी फंड्स हे सक्रिय आणि निष्क्रिय अशा दोन प्रकारचे असतात. एका सक्रिय फंड मध्ये व्यवस्थापक बाजारपेठेचे निरीक्षण करतो, कंपन्यांवर संशोधन करतो, कामगिरीचे परीक्षण करतो आणि गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्तम स्टॉक्स शोधतो. निष्क्रिय फंड मध्ये, फंड व्यवस्थापक एक पोर्टफोलिओ तयार करतो जो एक बाजारपेठेची प्रचलित इंडेक्स प्रतिबिंबित करतो, जसे की सेन्सेक्स किंवा निफ्टी फिफ्टी. याची उदाहरणे म्हणजे
“लार्ज कॅप” फंड्स जे अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात ज्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुस्थापित असतो.
“मिड कॅप” फंड्स जे मध्यम आकाराच्या
कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.
“स्मॉल कॅप” फंड्स हे लहान कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.
“मल्टी कॅप" फंड्स जे मोठ्या, मध्यम आणि लहान अशा मिश्र कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.
“सेक्टर" फंड्स हे एकाच प्रकारचा व्यवसाय असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. उदा. तंत्रज्ञान फंड्स हे तंत्रज्ञान विषयक कंपन्यांमध्येच गुंतवणूक करतात.
“थेमॅटिक” फंड्स जे एका सामाईक थीम मध्येच गुंतवणूक करतात. उदा. इन्फ्रास्ट्रक्चर फंड्स जे अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात ज्यांना पायाभूत सुविधा विभागाच्या गुंतवणुकीतून लाभ होतो.
“टॅक्स सेविंग फंडस्”
२. इन्कम किंवा बाँड किंवा फिक्स्ड इन्कम फंड्स: जे फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज, जसे की, सरकारी सिक्युरिटीज किंवा बाँड्स, कमर्शियल पेपर्स आणि डिबेंचर्स, बँक सर्टिफिकेट्स किंवा डीपॉझीट्स आणि ट्रेजरी बिल्स, कमर्शियल पेपर्स सारखी मनी मार्केट इन्स्ट्रुमेन्ट्स इ. मध्ये गुंतवणूक करतात. ह्या तुलनेने सुरक्षित गुंतवणुक आहेत आणि या उत्पन्न निर्मितीसाठी सोयीस्कर आहेत. याची उदाहरणे म्हणजे लिक्विड, कमी कालावधी, बदलता दर, कॉर्पोरेट डेब्ट, डायनॅमिक बाँड, गिल्ट फंड्स इ.
३. हायब्रीड फंड्स:
हे इक्विटी आणि फिक्स्ड इन्कम दोन्ही प्रकारच्या फंड्स मध्ये गुंतवणूक करतात, त्यामुळे ते दोन्हींमधले सर्वोत्तम म्हणजेच विकासाची क्षमता आणि त्याचबरोबर उत्पन्न निर्मिती दोन्ही देतात. उदा. अग्रेसीव्ह बॅलन्स्ड फंड्स, कॉन्झर्व्हेटिव्ह बॅलन्स्ड फंड्स, पेन्शन फंड्स, चाईल्ड प्लॅन्स आणि मासिक उत्पन्न योजना इ.
४. सोल्युशन ओरिएंटेड फंड्स : विशिष्ट उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेऊन केलेली म्युचूअल फंडातील गुंतवणूक सोल्युशन ओरिएंटेड फंड्स प्रकारात मोडते. यामध्ये रिटायरमेंट सोल्युशन , रिटायरमेंट कॉपर्स फंड , पेन्शन फंड . या फंडाचा कालावधी दीर्घ असतो.
#mutualfund
#fandamutualfandacha
#म्युच्युअलफंड #गुंतवणूक #आर्थिकनियोजन #धनवृद्धी #फंडाम्युच्युअलफंडाचा
#MutualFundsMarathi #SIPInvestment #FinancialLiteracy #WealthCreation #InvestmentTips #PersonalFinanceMarathi #ShareMarketMarathi
#DhanVriddhi #MarathiBlog #MarathiBlogger #FinanceInMarathi #SmartInvestor
डॉ. रिता सविता मदनलाल शेटीया
लेखिका अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा